' रत्नागिरीतला पहिलावहिला आंबा पर्यटन महोत्सव रत्नागिरीच्या
पर्यटन विकासाची नांदी ठरेल', 'कोल्हापुरात जसा दरवषीर्
दसरा महोत्सव होतोच, त्या धतीर्वरच हा आंबामहोत्सव झाला
पाहिजे. भाट्ये किनाऱ्यावर असा महोत्सव दरवषीर् साजरा होण्यासाठी आराखडा करून
दिलात तर सरकारकडून कायमस्वरूपी निधी मिळवून देण्याची जबाबदारी माझी' असे असा विश्वास विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केले. पुढच्या
महोत्सवाआधीच हे स्थळ विकसित झालेले असेल, असेही
आश्वासन मोहिते यांनी यावेळी दिले.
आकर्षक रोषणाई, पालखीनृत्य,
दशावतारातील श्रीराम-रावण युद्धखेळ तसेच सुमधुर संगीताच्या
तालावर बेभान झालेल्या शेकडो उपस्थितांच्या साक्षीने थाटामाटात रत्नागिरीतल्या
पहिल्यावहिल्या आंबा पर्यटन महोत्सवाला सुरूवात झाली. महोत्सवाचे उद्घाटन
पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम
यांच्या हस्ते
होईल. महोत्सवात विशेष औत्सुक्याची बाब ठरली ती विविध सांस्कृतिक देखाव्यांची मिरवणूक! रत्नागिरी शहरबाजारपेठांतून निघालेल्या या मिरवणुकीतील दशावताराच्या, कोळीबांधवांच्या रूपातली शाळकरी मुले पाहण्यासाठी गावकऱ्यांची गदीर् जमली होती. मोहिते-पाटील, रामदास कदम, आमदार भास्कर जाधव, उदय सामंत आदी नेतेही भाट्ये किनाऱ्यापर्यंत मिरवणुकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी व महोत्सवाचे अध्यक्ष विकासचंद रस्तोगी यांनी पाहुण्यांचे आंब्याचा हार घालून स्वागत केले. महोत्सवात 'रत्नागिरी हापुस आंब्या'ला विशेष मागणी होती. जवळच्या गावांमधील महिला बचत गट, बागायतदार शेतकरी आणि इतर गावकऱ्यांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिल्यामुळे तेही खुशीत होते. महोत्सवाला स्थानिक नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असला तरी परदेशी आणि देेशी पाहुण्यांनी मात्र महोत्सवाला हजेरी न लावल्याने आयोजक नाराज होते. यंदा महोत्सवात राहिलेल्या त्रुटींची पूर्तता भविष्यातील महोत्सवात करून हा सोहळा अधिक दिमाखदार करण्यात येईल, असा विश्वास रस्तोगी यांनी व्यक्त केला.
-
Maharashtra
Times
|
Wednesday, 6 March 2013
आंबा महोत्सव – रत्नागिरी
Subscribe to:
Posts (Atom)